आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या MNSच्या पदाधिकाऱ्यांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात फेरीवाल्यांविरोधात मनसेने राजाराम पुलाजवळ हे आंदोलन केले होते.
 
त्याचसोबत, फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील हल्ल्याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यातही मनसेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात हाणामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसेने पुण्यात काल फेरीवाल्यांविरोधात जोरदार आंदोलन केले होते. सिंहगड रोडवरील फेरीवाल्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी हटवले होते. FC, JM, सिंहगड रोडवर व राजाराम पुलाजवळ असणाऱ्या फेरीवाल्यांना मनसैनिकांनी हुसकावून लावले होते.
 
जंगली महाराज रस्त्यावर कपडे, खाद्यान्न, पाणीपुरी विकत असलेल्यांना लक्ष्य करण्यात आले होते. त्यांचे स्टॉल उधळून लावण्यात आले. काही जणांना धक्काबुक्कीही करण्यात आली. पादत्राणांच्या दुकानांनाही या आंदोलनाचा फटका बसला. सिंहगड रोड परिसरातही अनेक फळे आणि भाजीपाल्यांचे स्टॉल मनसेच्य कार्यकर्त्यांनी उधळून लावले होते.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...