आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर कपडे घेऊन जाणा-या ट्रकला आग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- पुणे-मुंबई हायवेवर ट्रकला लागलेली आग)

पुणे- मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर आज मुंबईहून बंगळुरूकडे चाललेल्या एका कपड्याच्या ट्रकला अचानक लागलेल्या आगीत ट्रक जळून खाक झाला. या आगीच लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे या हायवेवर 3 ते 4 तास वाहतुकीचा खोळंबा झाला.
ही घटना खंडाळा येथे पहाटे तीनच्या सुमारास घडली. यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, या आगीमुळे वाहतुकीच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रात्रीची वेळ असल्याने याचा फार गवागवा झाला नाही. मात्र तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर ट्रकमधील आग विझवण्यात यश आले. मात्र, ट्रफिक जाम होऊ नये यासाठी एक लेन उपलब्ध करून देण्यात आली होती.