आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे: स्वस्त वस्तूंसाठी प्रसिद्ध असलेल्या तुळशीबागेतील 7-8 दुकानांना आग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यातील मध्यवस्तीतील स्वस्त वस्तूंसाठी व महिलांच्या वस्तूंसाठी प्रसिद्ध असलेल्या तुळशीबागेत आज पहाटे मध्यरात्री आग लागली. यात आगीत 7-8 दुकाने जळून खाक झाली आहेत. यात मोठे आर्थिक नुकसान झाले असले तरी जीवितहानी झाली नाही.
तुळशीबागेतील अरूंद रस्ते व दुकानाला दुकाने खेटून असल्याने आग विझवण्यास अग्निशमन दलाला अडथळे येत होते. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी मेहनत घेत आग विझवण्यात यश मिळवले. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. शॉर्टसर्किटमुळे आग असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.