आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्‍यात कोथरुडमध्‍ये 6 मजली इमारतीला भीषण आग, 46 वाहने जळून खाक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- शहरातील कोथरुडमध्ये एक सहा मजली इमारतीला लागलेल्या आगीत 46 वाहने जळून खाक झाली असून दोन मजले भस्‍मसात झाले. आगीतून 50 जणांना सुखरुप वाचविण्‍यात यश आले आहे.

कोथरुडमधल्या त्रिमूर्ती हाईट्समध्ये रात्री दीडच्या सुमारास हे अग्नितांडव घडले. आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाच्या 11 गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आग सकाळी विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले. इमारतीच्‍या तळमजल्‍यावर पार्किंगची सोय आहे. तेथील 46 गाड्या जळून खाक झाल्‍या. तर पहिला आणि दुसरा मजलाही भस्‍मसात झाला. या मजल्‍यावर राहणा-यांचे मोठे नुकसान झाले आहे. आग कशामुळे लागली, हे कळू शकले नाही.

(संग्रहित छायाचित्र)