आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्‍यातील प्रसिद्ध गोल्‍डन बेकरीला भीषण आग; अग्निशमनदलाच्‍या 5 गाड्या, 2 टँकर घटनास्‍थळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- गुलटेकडी इंडस्ट्रीयल इस्टेटमधील प्रसिद्ध गोल्डन बेकरीला आज शुक्रवारी 12 वाजण्‍याच्‍या सुमारास मोठी आग लागली. अग्निशामक दलाच्या पाच गाड्या आणि 2 टँकर घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 


शहरात गोल्‍डन बेकरी हे मध्‍यवर्ती ठिकाण असल्‍यामुळे आजूबाजूच्‍या रहिवासी परिसराला धोका पोहोचण्‍याची शक्‍यता वर्तवली जात आहे. वर्दळीचे ठिकाण असल्‍याने येथे मोठ्या प्रमाणात बघ्‍यांची गर्दी जमली आहे. आज पावणे 12 वाजेच्‍या सुमारास नेहमीप्रमाणे भट्टी सुरु असताना अचानक भडका उडाला आणि आग लागली. थोड्याच वेळात आगीने रौद्र रुप धारण केले. जिवितहानी झाल्‍याचे अद्याप वृत्‍त नाही तसेच  आगीचे नेमके कारणही अद्याप समजू शकलेले नाही. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो... 

बातम्या आणखी आहेत...