आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील केमिकल कंपनीला भीषण आग, 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगेवर नियंत्रण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूणे- शेलारमळा येथील कुसुम डिस्लेशन या पेंटच्या कंपनीला आज (रविवारी) सायंकाळी साडे पाचच्या सुमारास थिनरच्या ड्रमचा स्फोट होऊन आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 18 गाड्यांनी आग आटोक्यात आणली.

 

घटनास्थाळी पिंपरी, पुणे, बजाज, टाटा, चाकण येथील वोक्स वेगन, चाकण एमआयडीसी इत्यादी ठिकाणच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले होते. दोन तासाच्‍या प्रयत्‍नानंतर  आग आटोक्यात आणली. कंपनीला आज सुट्टी असल्याने कोणतीही जिवीत हानी झाली नाही. मात्र यामध्ये केमिकलचे दहा ते बारा बॅरल जळाल्याने कंपनीचे आर्थीक नुकसान झाल्‍याची माहिती निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर अवताडे यांनी दिली.

आग लागली त्यावेळी कंपनीमध्ये थिनरचे  200 लिटरचे 25 ड्रम होते. त्यामधील 3 ड्रमचा स्फोट होऊन हवेत उडाले. त्यानंतर इतर ड्रमनी पेट घेतल्याने आग पसरली. पेंटमध्ये थिनर मिक्स करण्याचे काम ही कंपनी करते. मात्र हा स्फोट कशामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही.

बातम्या आणखी आहेत...