आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजगुरूनगरमध्ये इमारतीला आग: मोठी दुर्घटना टळली, 15 दिवसात तिसरी घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- राजगुरुनगर येथील स्वामी समर्थ सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावर आज दुपारी अचानक आग लागली घडली. फ्लॅटमधील गॅसच्या सिलिंडरचा स्फोट होण्याची शंकेने इमारतीमधील सर्व नागरिकांना तात्काळ बाहेर काढण्यात आले. सॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

राजगुरूनगर येथील स्वामी समर्थ वसाहतीमध्ये घटना ही घटना घडली. सुदैवाने यात कुठलीही जिवितहानी झाली नाही. आगीची माहिती कळताच अग्निशमनदलाच्या २ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमक दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नानंतर आगेवर नियंत्रण आणण्यात यश आले आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती अनिशान दलाच्या जवानांनी दिली आहे. 

राजगुरूनगर परिसरात गेल्या १५ दिवसात आगेची ही तिसरी घटना घडली आहे. या आधी देखील २५ में रोजी २ इलेकट्रोनिकच्या दुकानाला भीषण आग लागल्याचं प्रकार घडला होता. त्याचबरोबर मिठाईच्या दुकानाला देखील आग लागल्याची घटना घडली आहे. 
बातम्या आणखी आहेत...