आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरीत साधू वासवानी गार्डनजवळ गोळीबार; हल्लेखोर पसार, जखमी व्यक्तीची स्थिती गंभीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घटनास्थळावरील दृश्य. - Divya Marathi
घटनास्थळावरील दृश्य.
पुणे- पिंपरी येथील साधू वासवानी गार्डनजवळ संतोष कुरवत यांच्यावर गोळीबार झाला आहे. त्याच्या शरीरात 2 गोळ्या असल्याचे सांगण्यात येत आहे. हल्लेखोराने 3 गोळ्या झाडल्या, त्यापैकी एक शरीराला चाटून गेली आहे  त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.  
 
घटनेनंतर हल्लेखोर पसार झाला आहे. पिंपरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. हा पूर्व वैमनस्यातून गोळीबार झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. जखमी संतोष कुरवत हे हॉटेलमध्ये चहा पित बसले असता हॉटेलमध्ये आलेल्या 3 जणांपैकी एकाने गोळीबार केला त्यात ते गंभीर जखमी आहेत.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि व्हिडीओ
बातम्या आणखी आहेत...