आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात 24 तासांत दुसर्‍यांदा गोळीबार; तरुणाचा खांदा आणि कमरेत घुसल्या चार गोळ्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- भोसरी येथील गवळीमाथा चौकात एका तरुणावर सकाळी सहा वाजता गोळीबार करण्यात आला. विजय पांडुरंग घोलप (वय 34, रा. गवळी माथा, भोसरी), असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेत विजय गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर चिंचवडच्या निरामय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

दोन हल्लेखोर दुचाकीवरून आले होते. त्यांनी विजयवर अचानक गोळीबार केला. विजयच्या खांद्याला, कमरेवर चार गोळ्या लागल्या असून तो गंभीर जखमी झाला आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. गोळीबाराचे कारण अद्याप समजलेले नाही.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या 24 तासांत गोळीबार झाल्याची दुसरी घटना आहे. काल (शुक्रवारी) पिंपरीतील साधू वासवानी उद्यानाजवळील एका हॉटेलमध्ये संतोष कुरावत या सराईत गुन्हेगारावर धारदार शस्त्राने हल्ला करून गोळीबार करण्यात आला होता.

शहरात लागोपाठ घडलेल्या दोन गोळीबारांच्या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच यामुळे शहरातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली असून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
बातम्या आणखी आहेत...