आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Firing Over Tender In Pune ;crime Book Against Former State Homeminister's Sun

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यात टेंडर मिळवण्यासाठी गोळीबार ;माजी गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाविरोधात गुन्हा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - कंत्राट आपल्यालाच मिळावे यासाठी प्रतिस्पर्ध्यांवर गोळीबार करून तलवार व चॉपरने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचा मुलगा कुलदीप व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत काँट्रॅक्टर विवेक महादेव यादव व त्यांचे सहकारी इजाज शेख, सागर खंडागळे हे जखमी झाले.

खडकी कँटोन्मेंट बोर्डाचे वाहन प्रवेशकर वसुलीचे कंत्राट घेण्यासाठी यादव यांनी शेख व खंडागळे हे 11 फेब्रुवारी रोजी बोर्डाच्या कार्यालयात पाठवले होते. तिथे बोर्डाचे माजी उपाध्यक्ष मनीष आनंद, कुलदीप, तेजिंदरसिंग अहुलवालिया, अनमोलसिंग चढ्ढा, आशिष महेदू, उबेद खान, जोहेब खान उपस्थित होते. त्यांनी शेख व खंडागळे यांना टेंडर भरू दिले नाही. त्यामुळे यादव स्वत: सहका-यांसह गेले असता बोर्डाचा दरवाजा बंद होता. आतील बाजूस मनीष आनंद व विजय शेट्टी उभे होते. त्यांनी आमच्या दिशेने गोळीबार करून तीन फायर केल्या, तर कुलदीप व इतर साथीदारांनी मारहाण केल्याची तक्रार यादव यांनी दिली आहे.