आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First BajiRao Peshwa Tomb At Raverkhedi Khargoan District

PHOTOS : बाजीरावांचा मृत्‍यू कसा झाला, कुठे आहे समाधी, वाचा रंजक माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाजीरावांचे समाधी स्‍थळ. इन्‍सेट बाजीराव. - Divya Marathi
बाजीरावांचे समाधी स्‍थळ. इन्‍सेट बाजीराव.
थोरले बाजीराव पेशवे यांची गुरुवारी पुण्‍यतिथी आहे. गत वर्षी त्‍यांच्‍या जीवनावर आधारित 'बाजीराव-मस्‍तानी' या हिंदी चित्रपटाने 100 कोटींपेक्षा अधिक गल्‍ला जमवला. मात्र, या वीर योद्ध्याचे समाधीस्‍थळ अजूनही उपेक्षित असून, या ठिकाणी कुठल्‍याच सोयी सुविधा नाहीत. त्‍यावर divyamarathi.com ने टाकलेला हा प्रकाशझोत...
कसा झाला मृत्‍यू ?
- बाजीराव हे हे वयाच्‍या 20 व्‍या वर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे पेशावा झाले.
- त्‍यांनी 30 ते 35 लढाय्या लढल्‍या आणि त्‍या सर्व जिंकल्‍या.
- मराठ्यांची ही विजयी घोडदौड सुरूच होती.
- बाजीरावांनी 27 फेब्रुवारी 1740 रोजी नासिरजंग त्‍यांनी लढाई जिंकली आणि मुंगीपैठण येथे तह केला.
- या तहात नासिरजंगने हंडिया व खरगोण प्रांत बाजीरावांना दिले.
- त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी 30 मार्च 1740 रोजी बाजीराव खरगोणला गेले.
- रणरणत्‍या उन्‍हात घोडेस्‍वारी करताना रावेरखेडी या छोट्याशा गावाजवळ त्‍यांना अचानक उष्‍माघात झाला.
- यातच 28 एप्रिलला त्‍यांनी नर्मदेच्‍या तिरावर वयाच्‍या 40 व्‍या वर्षी प्राण सोडले.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, कुठे आहे समाधी ? कशी झाली दुरवस्‍था... समाधी स्‍थळाकडे कसे जाल...