आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

VIDEO: बेलवाडीत रंगले तुकाराम महाराज पालखीचे पहिले गोल रिंगण, बघा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेलवाडी (पुणे जिल्हा)- संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पहिले गोल रिंगण आज (गुरुवार) बेलवाडीतील मैदानावर पार पडले. हा अलौकिक सोहळा बघण्यासाठी लाखो वारकरी उपस्थित होते. फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ-मृदंगांचा गजर, माऊली नामाचा जयघोष, प्रचंड उत्साही वातावरण आणि आकाशात जमलेली ढगांची गर्दी यावेळी बघायला मिळाली. त्यात पालखी रिंगणाने एक वेगळीच झळाळी आणली. त्याने वैष्णव सुखावला. वारीचा पहिला उद्देश सफल झाला. अश्वाच्या पायाची धूळ कपाळावर लावण्यासाठी वारकऱ्यांनी एकच जल्लोष केला होता.
बारामती तालुक्यातील काटेवाडीत काल संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे मेंढ्यांचे रिंगण पार पडले. तुकोबांचे दर्शन घेतल्याने वर्षभर मेढ्यांचा कळप रोगराईमुक्त राहतो असा स्थानिक मेंढपाळांचा विश्वास आहे. सणसर मुक्काली आलेल्या वारकऱ्यांना ईदच्या पूर्वसंध्येला मुस्लिम भाविकांनी शिरखुर्मा देऊन पाहुणचारही दिला. त्यानंतर आस लागली होती ती पहिल्या गोल रिंगणाची.
आज दुपारच्या सुमारास पालखीचे पहिले गोल रिंगण झाले. छायाचित्रांच्या माध्यमातून बघा पहिल्या गोल रिंगणाच्या रोहळ्यातील उत्साही जल्लोष.... पुढील स्लाईडवर क्लिक करा.... नवव्या स्लाईडवर बघा, रिंगण घालणाख्या अश्वाचा रोमांचक व्हिडिओ.....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...