आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावित्रीबाईंच्‍या शाळेत जाणा-या मुलींना लोक म्‍हणत, यांच्या 7 पिढ्या नरकात जातील!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- स्वत: शिक्षित होऊन महिलांनाही शिक्षणाची गोडी लावणा-या ज्येष्ठ समाजसेविका सावित्रीबाई फुले यांची आज 3 जोनवारीला जयंती. हा दिवस महिला मुक्‍ती दिन म्‍हणून साजरा केला जातो. सावित्रीबाई केवळ महिलांना शिक्षण देऊन थांबल्या नाहीत. त्यांना सक्षम, धाडसी करण्‍यासाठी विविध रूढी परंपरांचा नायनाट करण्‍याचे कामही त्‍यांनी केले. या संग्रहात जाणून घेऊन सावित्रीबाई यांच्‍या आयुष्‍यातील काही खडतर प्रसंग...
 
लहानपणापासून जिद्दी होत्‍या सावित्रीबाई-
 
- शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला म्हणून सावित्रीबाई फुले यांना ओळखले जाते. लहानपणापासूनच सावित्रीबाई यांच्‍यात जिद्द आणि चिकाटी होती. 
- सावित्रीबाईंचा जन्‍म 3 जानेवारी 1831 मध्‍ये सातारा जिल्ह्यातील ‘नायगाव’मध्ये झाला. त्यांना अत्‍याचाराची भयंकर चिड होती.
- लहानपणीच त्यांनी एका दुबळ्या मुलाचे फूल हिसकावून घेणा-या माणसाला अद्दल घडवली होती.
- सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिल खंडोजी नेवसे गावचे पाटील होते.
- 1840 मध्‍ये जोतिराव फुल्यांशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. त्‍या 9 वर्षाच्‍या होत्‍या, तर जोतिराव 13 वर्षाचे.
- सावित्रीबाईंचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे फुरसुंगीचे क्षीरसागर होत.
- गोविंदरावांना पेशव्यांनी पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला राहिले.
- फुलांच्या व्यवसायावरून या परिवाराला फुले हे आडनाव मिळाले.
 
लोक म्‍हणत शिकेल त्‍याच्‍या 7 पिढ्या नरकात जातील-
 
- तत्‍कालिन परिस्‍थितीत लोकांमध्‍ये मोठ्या प्रमाणात अज्ञानरुपी अंधकार होता. लोक म्‍हणत ‘जो शिकेल, त्याच्या सात पिढ्या नरकात जातील.’ 
- म्हणून फुल्‍यांनी काढलेली पहिली शाळा मध्येच बंद पडली होती. 
- त्यावर उपाय म्हणून त्यांनी लोकांना सांगितले की, ‘‘गो-या साहेबांनी एक शोध लावलाय की, जो शिकणार नाही त्याच्या चौदा पिढ्या नरकात जातील’. नरकाच्या भीतीने लोक शिक्षणाला होकार देऊ लागले.
 
पुढील स्‍लाईड्सवर क्‍लिक करून वाचा, तत्‍कालिन काही प्रसंग, पाहा फोटो....
बातम्या आणखी आहेत...