आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घुमानच्या संमेलनातही परिसंवादांची रेलचेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - एप्रिल महिन्यात घुमान येथे होणाऱ्या बहुभाषा साहित्य संमेलनात दोन दिवसांत सहा परिसंवादांची रेलचेल असून, देशभरातील सुमारे शंभर साहित्यिक सहभागी होणार आहेत. घुमानला संतश्रेष्ठ श्री नामदेव नगरी असे नाव देण्यात आले आहे तर अन्य दोन समारंभस्थळांना रवींद्रनाथ टागोर आणि संत कबीर सभागृह अशी नावे देण्यात आली आहेत.

आयोजक संस्था असणाऱ्या ‘सरहद’चे संजय नहार, संयोजक भारत देसडला आणि निमंत्रक राजन खान यांनी येथे ही माहिती दिली. ज्येष्ठ भाषातज्ज्ञ व संशोधक डॉ. गणेश देवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असतील. संमेलनाचे उद््घाटन ३ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता होईल. समारोप तर ४ एप्रिलला दुपारी ४ वाजता होईल.

असे आहेत कार्यक्रम
> बहुभाषा कविसंमेलनात विविध भाषांतील कवींचा सहभाग
> परिसंवाद - भाषांमधील परस्परसंवाद, अनुवादाचे महत्व, बोलीभाषंाचे जतन, भारतीय भाषांचे भवितव्य आणि साहित्य, माझी भाषा आणि वर्तमानकालीन साहित्य
> पुस्तक प्रकाशन-संत नामदेव विहंग दर्शन - नि. ना. रेळेकर, रागनियॉँ -राजवंत राज (कॅनडा).
डॉ. कामत यांना पुरस्कार
बहुभाषा संमेलनाच्या निमित्ताने भाषाविषयक महत्त्वाचे कार्य करणाऱ्या लेखक-संशोधकाला साने गुरुजी राष्ट्रीय भाषा गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. ज्येष्ठ लेखक डॉ. अशोक कामत या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
बातम्या आणखी आहेत...