आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एप्रिलमध्ये पहिला नॅशनल स्टुडंट्स फिल्म फेस्टिव्हल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- भारतीय चित्रपटाची शताब्दी अधोरेखित करण्यासाठी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या आद्य संस्थेने पुढाकार घेऊन पहिला नॅशनल स्टुडंट्स फिल्म फेस्टिव्हल एप्रिल महिन्यात आयोजित केला आहे. देशातील युवा फिल्म मेकर्सची प्रतिभा यानिमित्ताने जाणकारांसमोर येईल, असे मत एफटीआयआयचे संचालक डी. जे. नरेन यांनी येथे ही घोषणा केली.

या महोत्सवाच्या निमित्ताने एफटीआयआयतर्फे पहिल्या नॅशनल स्टुडंट्स फिल्म अवॉर्डचीही घोषणा करण्यात आली. पुण्यात 19 ते 24 एप्रिल दरम्यान, हा महोत्सव होईल. फिक्शन, नॉन फिक्श्न, अ‍ॅनिमेशन अशा तीनही विभागांत हे पुरस्कार दिले जातील आणि ते निर्मिती, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, संपादन, ध्वनिलेखन, पटकथा-संवाद आदी विभागांसाठी असतील. निवड करण्यासाठी तज्ज्ञांची समिती असेल. यानिमित्ताने युवा फिल्म मेकर्सचे विचार, त्यांची प्रतिभा, मांडणीची पद्धत, टीमवर्क, तांत्रिक कौशल्य, सर्जनशीलता यांचा कस लागेल. त्यांना एक व्यासपीठ मिळेल. फेस्टिव्हलमध्ये चित्रपटांसह विविध विषयांवरील कार्यशाळा, सप्रयोग व्याख्याने, चर्चासत्रे अशा उपक्रमांचाही समावेश असेल, असे ते म्हणाले.