आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यात साकारला देशातील पहिला पॅडी आर्ट प्रकल्प

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - अतिपूर्वेकडील जपानमध्ये उगम पावलेला आणि आता जगप्रसिद्ध बनलेला ‘पॅडी आर्ट’ या कलेशी नाते सांगणारा देशातील पहिला पॅडी आर्ट प्रकल्प पुण्यात साकारला आहे. सिंहगड रस्त्यावरील डोणजे फाटा येथे डॉ. श्रीकांत इंगळहळ्ळीकर यांनी आपल्या कंपनीच्या आवारातच ‘पॅडी आर्ट’ साकारला आहे. भारतीय संस्कृतीला अनुसरून डॉ. इंगळहळ्ळीकरांनी पॅडी आर्टमधून श्रीगणेश साकारला आहे. त्यांची लांबी ४० मीटर आहे आणि तो दोन रंगांत केला आहे. त्यासाठी धो-धो पावसात गुडघाभर पाण्यात उभे राहून दोन रंगांच्या भातपिकांची पेरणी करण्याचे आव्हान त्यांनी पेलले आहे.

दक्षिण जपानमध्ये इनाकादाते गावात पॅडी आर्टचा जन्म झाला. कोणत्याही यंत्राच्या वापराविना इथे भातशेती केली जाते. या भातशेतीला २००० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने येथील सर्व शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी ही परंपरा उत्सवाच्या रूपाने साजरी केली. शेताचा पृष्ठभाग कॅनव्हासप्रमाणे वापरून, भातपिकांचे विविध रंगी वाण वापरून त्यांनी त्यांना पूज्य असणारा माउंट इयाकी शेतात साकारला. हीच पॅडी आर्ट होय.

डिसेंबरपर्यंत खुले : डॉ. इंगळहळ्ळीकरांना या उत्सवाची माहिती मिळाल्यावर त्यापासून प्रेरणा घेत त्यांनी स्वत:च्या शेतात पॅडी आर्टपासून गणपती साकार केला. थोड्या उंचावरून या पॅडी आर्टचा आनंद घेता येतो. हे पॅडी आर्ट डिंसेबरपर्यंत पर्यटकांना पाहता येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...