आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Skill Development Resident University In Indore

निवासी कौशल्य विकास विद्यापीठ इंदूरमध्ये, देशातील पहिलीच संस्था

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - अभ्यासक्रम आणि उद्योगविश्वाच्या गरजा याची नेमकी सांगड घालण्याचा हेतू ठेवून देशातील पहिले निवासी कौशल्य विकास विद्यापीठ ‘सिम्बायोसिस फाउंंडेशन’च्या वतीने मध्य प्रदेशात इंदूर येथे उभारण्यात येणार आहे. या विद्यापीठासाठी रिलायन्स कॅपिटल, मान ट्रक्स, एचडीएफसी बँक तसेच फ्यूचर समूह यांच्याशी विविध सामंजस्य करार पुण्यात करण्यात आले. २०१६ पासून या विद्यापीठाचे प्रत्यक्ष काम सुरू होईल.
सिम्बायोसिस फाउंडेशनच्या उपाध्यक्षा डॉ. स्वाती मुजुमदार यांनी ही माहिती दिली. या वेळी सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एस. बी. मुजुमदार यांच्यासह मान ट्रक्स इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश भट, रिलायन्स कॅपिटलचे पुष्करसिंह कटारिया, एचडीएफसी बँकेचे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश रेलान, सेंटर फॉर रिटर्न एक्सलन्सच्या प्रमुख पुनीता गिप्सन हे उपस्थित होते. डॉ. मुजुमदार म्हणाल्या, ‘इंदूर येथे उभारण्यात येणाऱ्या या निवासी काैशल्य विद्यापीठात देशभरातील विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारच्या अद्ययावत सुविधा असतील. औद्योगिक संशोधन आणि विकास केंद्रही येथे स्थापन करण्याची योजना अाखण्यात येणार आहे.’
औद्योगिक भागीदारीची वैशिष्ट्ये
रिलायन्स कॅपिटल : अखंड फायनान्स प्लाझा आणि वित्तीय क्षेत्रातील सेवा उत्पादनांचे प्रशिक्षण
मान ट्रक्स इंडिया : ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील नॉलेज पार्टनरशिप
एचडीएफसी बँक : बँकिंग क्षेत्रातील अनुभव आणि प्रत्यक्ष सहभाग
फ्यूचर ग्रुप : प्रशिक्षणासाठी अद्ययावत स्टोअरची उभारणी व रिटेलशी संबंधित अभ्यासक्रम विकसित करणे
विद्यापीठाची वैशिष्ट्ये
इंदूरमध्ये ३० एकरांचा भव्य परिसर
पहिल्या टप्प्यात १० लाख स्क्वेअर फूट बांधकाम करण्याचे नियाेजन
अकॅडमिक लॅब, होस्टेल, मेस यांना प्राधान्य
कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मिळणार अत्याधुनिक मशिनरी, टूल्स
स्टिम्युलेशन बेस्ड ट्रेनिंगचीही सुविधा
इंडस्ट्रियल वर्कशॉपमध्ये प्रात्यक्षिकाची संधी
रिटेल, ऑटोमोटिव्ह, बँकिंग, कन्स्ट्रक्शन, वित्त आणि आयटी क्षेत्राच्या गरजांनुरूप प्रशिक्षण
औद्योगिक संशोधन आणि विकास केंद्र