आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरफोडी करणाऱ्या 5 चोरट्यांना पोलिसांच्या बेड्या, 7 लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पिंपरी चिंचवड परिसरात घरफोडी आणि दुचाकी चोरी करणाऱ्या दोन टोळ्यांच्या मुसक्या आवळण्यात चिंचवड पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 11 दुचाकी आणि 10 घरफोड्यामधून चोरी केलेला तब्बल 7 लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मोहम्मद चौधरी (वय वर्ष 21 रा.कुडाळवादी चिखली पुणे) आणि नौशाद शेख (वय वर्ष 19)हे दोघे वाल्हेकरवाडी येथे रात्रीच्या वेळी भरधाव वेगात दुचाकीवरून जात होते. तेव्हा गस्त घालणाऱ्या चिंवड पोलिसांनी त्यांना हटकले. मात्र त्यांच्या कडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांनी त्यांची चौकशी केली. तेव्हा गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून नऊ दुचाकी आणि एक मोबाईल जप्त करण्यात आले आहे. 

दुसऱ्या घटनेत सुरेश जाधव (वय वर्ष 27 रा. रामनगर चिंचवड) आणि अविनाश मोहिते (वय वर्ष 23 रा. चिंचवड) हे दोघे रात्रीच्या वेळी दुचाकीवरून फिरत होते मात्र पोलिसांना पहाताच त्यांनी पळ काढला. फिल्मी स्टाईल पाठलाग करून पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांची अधिक चौकशी केली असता, सागर राम भडकवाड याचे नाव समोर आले. त्यांच्याकडून दोन दुचाकी, 60 ग्रॅम सोनं, सात एलसीडी टीव्ही आणि रोख 44 हजार असा एकून 3 लाख 87 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. त्यांनी पिंपरी चिंचवड परिसरात 10 घरफोड्या केल्याची कबुली दिली. या पाच जणांना अटक करण्यात आली असून उद्या पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. त्यांच्याकडून एकूण 19 गुन्हे उघड झाले आहेत.
 
ही कारवाई पोलीस उपयुक्त गणेश शिंदे, सहाययक पोलीस आयुक्त राम मांडुरके आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, प्रशांत महाले आणि विलास होनमाणे यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...