आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात आरोपींना पोलिस कोठडी, तिघांना जामीन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे विद्यापीठात पुनर्मूल्यांकनात 21 विद्यार्थ्यांचे गुण वाढवून त्यांना उत्तीर्ण केल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे. या प्रकरणात अटकेत असलेल्या उपकुलसचिवांसह सात आरोपींची पोलिस कोठडी बुधवारी पुन्हा वाढविली.

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के.एम. पिंगळे यांनी सात आरोपींना 19 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तर तिघांची जामिनावर मुक्तता केली.याप्रकरणी चतृश्रृंगी पोलिसांनी विद्यापीठाचे उपकुलसचिव लालसिंग शंकर वसावे, नंदा भीमराव पवार, राजेंद्र पंडित, सुरेंद्र नायडू, रामदास नायडू, अलआमरी सामी हमीद, ओवेदे अहमद रहमान अवाध, मोहसीन मेहबूब शेख यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 19 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तर रमेश किसन शेलार, अशोक शंकर रानवडे व चेतन गजानन परभणे या तीन कनिष्ठ सहाय्यकांना जामीनमंजूर करण्यात आला.