आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Five Tractors Model Launched Under Mahindra's Yuvo Range

महिंद्राचे यूवो रेंजअंतर्गत ट्रॅक्टरचे पाच मॉडेल लाँच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - महिंद्रा अँड महिंद्राच्या फार्म इक्विपमेंट सेक्टरने यूवो ब्रँडअंतर्गत ट्रॅक्टरचे पाच मॉडेल लाँच केले आहेत. कंपनीने पुण्यात याची एक्स शोरूम किंमत ५.४० लाख ते ६.५५ लाख रुपयांदरम्यान ठेवली आहे. ३० ते ४५ हॉर्सपॉवर एचपी क्षमतेचे हे ट्रॅक्टर १५ राज्यांमध्ये उपलब्ध असेल. ही मॉडेल आहेत : २६५ डीआय(३२ एचपी), २७५डीआय(३५ एचपी), ४१५ डीआय(४० एचपी), ४७५ डीआय(४२ एचपी) आणि ५७५ डीआय(४५ एचपी). यामध्ये २६५ डीआयची किंमत ५.४० लाख रुपये आहे. ५७५ डीआय मॉडेलची किंमत ६.५५ लाख रुपये आहे. याशिवाय कंपनी १५ ते ५७ एचपी क्षमतेचे ट्रॅक्टरही बनवते.

महिंद्रा अँड महिंद्राचे कार्यकारी संचालक पवन गोयंका यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, यूवो ट्रॅक्टर संपूर्णपणे नव्या प्लॅटफॉर्मवर तयार केले आहे. हा बहुउपयोगी आहे. शेतीच्या विविध ३० कामात ट्रॅक्टरचा उपयोग केला जाऊ शकतो. त्यामुळे तो शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल. ही मॉडेल्स कंपनीने आपल्या स्टेट ऑफ द आर्ट आर अँड डी फॅसिलिटीमध्ये विकसित केले आहे. चेन्नईत महिंद्रा रिसर्च व्हॅलीमध्ये ते आहे. कंपनीने ट्रॅक्टर्सची ही श्रेणी १२ राज्यांतील ग्राहकांकडून मिळालेल्या ७००० सूचनांवर विकसित केली आहे. कंपनीने १,४०,००० तास प्रयोगशाळेत काम करून माॅडेल विकसित केले. यानंतर विविध १२ राज्यांत शेतीत चाचणी घेतली. यानंतर ट्रॅक्टर बाजारात उतरवण्यात आले.