पुणे- पिंपरी चिंचवडच्या आकुर्डी आणि निगडी परिसरात भर दिवसा धुके पडल्याची घटना घडली आहे. गुरुवारी सकाळी सव्वा अकरा ते साडेअकराच्या दरम्यान हा प्रकार घडला. भरदिवसा 15 मिनिटे हा निसर्गाचा खेळ सुरु होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
एरव्ही पहाटे पडलेलं धुके सकाळी उशिरापर्यंत असलेले आपण पाहिले आहे. मात्र अचानक धुकं पडून, सुमारे 15 मिनिटात गायब झाल्याने, निसर्गाच्या या अविष्काराची चर्चा पिंपरी चिंचवडमध्ये रंगली आहे.
पुढील स्लाईडवर पाहा व्हिडिओ