आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडणीसाठी शिक्षकाकडून विद्यार्थ्याचे अपहरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पुण्यातील कल्याणीनगर भागातील ११ वर्षाच्या मुलाला शिकवण्यासाठी घरी जाणा-या शिक्षकाने मुलाचे अपहरण करून दहा लाखांची खंडणी मागितल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. मात्र, पाेलिसांच्या सतर्कतेमुळे दिवेश खैर (रा.कल्याणीनगर,पुणे) या मुलाची वाघाेली येथून सुखरूप सुटका करण्यात अाली अाहे.

याप्रकरणी प्रसेन गुप्ता याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार झाला आहे. कल्याणीनगर येथे प्रसेन हा दिवेश या मुलाच्या घरी त्याचा वर्ग घेण्यासाठी जात असे. मंगळवारी सायंकाळी अाठ वाजण्याच्या सुमारास मुलाचे अपहरण केले. त्यानंतर त्याने खैर कुटुंबीयांकडे १० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. तसेच खंडणी न दिल्यास मुलास जिवे मारण्याची धमकी दिली. दिवेश याच्या पालकांनी याबाबत पाेलिसांना माहिती दिल्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली. दरम्यान, हडपसर येथील पाेलिस मार्शलला हा मुलगा बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास मांजरी येथे अाढळून अाला. त्यानंतर मुलाला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.