आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Foreign Scholars Accept Marathi Language As Classical Language

मराठीच्या अभिजाततेवर उमटली जागतिक मोहोर, परदेशी भाषातज्ज्ञांचीही मान्यता मिळाली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - मराठी भाषेच्या ‘अभिजात’पणावर आता जागतिक भाषातज्ज्ञांच्या मान्यतेचीही मोहोर उमटली आहे. ‘मराठी भाषा’ ‘अभिजात’ हा दर्जा मिळण्यास योग्य आहे, असा निर्वाळा जागतिक भाषातज्ज्ञांच्या समितीनेही दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. आगामी आठवड्यात ‘मराठी’ला अभिजात दर्जा देण्याची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे, यालाही सूत्रांनी दुजोरा दिला आहे.

मराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा मिळावा, यासाठी शासनाने समितीची नियुक्ती केली होती. या समितीने व्यापक संशोधन, पुरावे सादर करून मराठी ही ‘अभिजात भाषा’ आहे, हे सिद्ध करणारा सविस्तर अहवाल केंद्र सरकारला सादर केला. या अहवालाचे इंग्रजी भाषांतरही केंद्र सरकारला देण्यात आले. भाषेला ‘अभिजात’ दर्जा मिळण्याबाबतचे सर्व निकष या अहवालाने पूर्ण केले असल्याचे साहित्य अकादमीने जाहीर केले आहे. यापूर्वी ज्या भाषांना ‘अभिजात’ दर्जा देण्यात आला आहे, त्यांच्याबाबत फक्त भारतीय पातळीवरच तज्ज्ञांची समिती निर्णय घेत होती. यंदा प्रथमच विदेशी भाषातज्ज्ञांचे मतही जाणून घेण्यात आले. सूत्रांच्या म्हणण्यानुसार इतरही अनेक भाषांनी सध्या ‘अभिजात दर्जा’साठी दावे करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेवर विविध प्रकारचे ‘दबाव’ येत आहेत. त्यामुळे ‘अभिजातते’च्या निर्णयाला जागतिक परिमाण देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. त्याचाच भाग म्हणून विदेशी तज्ज्ञांची समितीही संबंधित अहवालावर मत देणार आहे.

पुढे वाचा, विदेशी समिती