आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Forest Officer Collect 1 Crores 25 Thousand Illegal Money

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वनाधिका-याने जमवली सव्वा कोटींची बेहिशेबी मालमत्ता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - तोडलेली झाडे घेऊन जाणारे पकडलेले ट्रक सोडून देण्यासाठी 25 हजारांची लाच घेताना वनसंरक्षक अधिकारी व त्याच्या चालकास लाचलुचपत विरोधी पथकाने (एसीबी) पकडले आहे. या वनसंरक्षकाच्या घरी टाकलेल्या छाप्यात एक कोटी 17 लाखांची बेहिशेबी संपत्ती आढळून आली आहे.


याप्रकरणी सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी (वर्ग-1) दत्तात्र्य भीमाजी भालेराव (53) चालक बाळु बबन एरंडेच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा झाला आहे. याबाबत अमर रंगनाथ मुळुक यांनी फिर्याद दाखल केली आहे. आरोपींना सत्र न्यायाधीश विनय जोशी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी आरोपींना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी दिली.


अमर मुळुक या शेतक-याच्या शेतातील तोडलेली बाभळीची झाडे घेऊन जात असताना भालेरावने त्यांचा ट्रक पकडला. ट्रक सोडण्यासाठी चालकामार्फत 25 हजाराची लाच मागितली. एसीबीचे पोलीस आयुक्त आर.व्ही.गलांडे यांच्या पथकाने 31 जुलै रोजी शिवाजीनगर बसस्थानकात सापळा रचून भालेराव व एरंडे यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर भालेरावकडे एक कोटी 17 लाखांची बेहिशोबी संपत्ती आढळली. त्याच्या न नातेवाईकांच्या नावे पुण्यात फ्लॅट, प्लॉट असल्याचे समोर आले आहे.


असे आहे घबाड
० सोन्याचे दागिने - 20 लाख 82 हजार 653 रूपये
० रोख - 33 लाख 2500 रूपये
० इतर मालमत्ता - 63 लाख 16 हजार 300 रूपये
० एकूण - एक कोटी 17 लाख एक हजार 453 रूपये