आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Cm Antuley Will Be Back On Laxman Jagtap & Rmesh Kadam

'काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अंतुलेंचा पाठिंबा व आशिर्वादही शेकापच्याच उमेदवारांना'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ज्यांनी बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्यासारख्या नेत्याला राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न केला तेच आता त्यांच्या आशीर्वादाची वाट पाहत आहेत. रायगडचा खरा विकास बॅरिस्टर अंतुलेंनीच केला व आजही रायगडचे नेते तेच असल्याने रायगड जिल्हयातील जनता त्यांचा सन्मान करते. त्यांच्या आशिर्वादांमुळेच लक्ष्मण जगताप यांचा विजय निश्चित झाला आहे असे आमदार जयंत पाटील यांनी शिळफाटा येथील सभेत बोलताना सांगितले.
मावळ लोकसभा मतदार संघातील शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) अधिकृत, मनसे व स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी पुरस्कृत उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी शिळफाटा येथे जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.
जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाचे रायगडमधील उमेदवार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. तसेच पक्ष म्हणून कॉग्रेसचे नेते बँ. अंतुले यांच्याशी आमचे मतभेद होते परंतु त्यांच्या कामाचे मात्र आम्ही वेळोवेळी कौतुक केले आहे. तर राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला करताना ते म्हणाले की, राष्ट्रवादीच्या प्रमुख आठ मंत्र्यांची संपत्ती विकली तर संपुर्ण महाराष्ट्रातील जनता कर्जमुक्त होईल ऐवढी प्रचंड संपत्ती या मंत्र्यांनी भ्रष्ट्राचारातून मिळविली आहे. सुनिल तटकरे यांनी आपली संपत्ती प्रतिज्ञापत्रात दहा कोटीच्या आसपास जाहीर केली असली तरी, प्रत्यक्षात मात्र त्यांची संपत्ती पंचवीसशे कोटीची असल्याचा आरोप आ. पाटील यांनी केला. तटकरे तसेच तटकरे कुटुंबियांकडे तीन हजार एकर जमीन, एकशे पन्नास कंपन्याचे भाग भांडवल एवढी प्रंचड मालमत्ता स्थावर व वित्तीय मालमत्ता असल्याचे सांगत हा सर्व पैसा त्यांनी राजकारणातून भ्रष्ट्राचारी मार्गाने कमविला आहे, असा आरोप यांनी केला.
‘पेण बँक’ पुन्हा सुरू व्हावी ही शेकापची भुमिका असल्याचे सांगत, ही बँक बुडविण्यामागे व ती पुन्हा सुरू न होण्यामागे राष्ट्रवादीच्या भ्रष्ट नेत्यांचाच हात असल्याचा आरोप पाटील यांनी केला. जगतापांना निवडुन देण्याचे आवाहन करताना त्यांचा संपूर्ण खासदार निधीतील जास्तीत जास्त हिस्सा घाटाखालील तिन्ही मतदार संघात विकास प्रकल्पांवर खर्च करण्याची ग्वाही या वेळी दिली.
लक्ष्मण जगताप यांनीही आपले विचार मांडतांना शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यावर जोरदार हल्ला चढवित बारणे हे नंबर एकचे लबाड व्यक्ती असल्याचे सांगितले. आपल्याला निवडून दिल्यास मावळ मतदार संघ भारतात नंबर एकचा विकसीत व सर्व सुविधांयुक्त मतदार संघ करण्याचे वचन त्यांनी जनतेला दिले. आघाडी व महायुती या दोन्ही पक्षांचे उमेदवार हे निवडणुकीपुरते आयात केलेले उमेदवार असून, त्यांना या निवडणुकीतच निर्यात करा असे आवाहन मतदारांना केले.