आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विज्ञान क्षेत्रात अमूल्य योगदान, चतुरस्र संशोधक हरपला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - विज्ञानाच्याक्षेत्रात भरीव कामगिरी करणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर यांच्या निधनाने चतुरस्र व्यक्तिमत्त्व हरपल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. त्यांनी भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) चे प्रमुख म्हणून योगदान दिले.

‘कीटकनाशकांचा विश्वकोश’ तयार केला. अग्निबाणांसाठी लागणारे घनइंधन बनवण्याची जबाबदारी गोवारीकर यांच्यावर सोपवण्यात आली. त्यासाठी त्यांनी प्रॉपेलंट इंधन कॉम्प्लेक्स, आयोनियम परक्लोरेट प्लांट अशा पूरक यूनिट्सची स्थापना केली. ‘सॉलिड प्रॉपेलंट स्पेस बूस्टर प्लांट’ हे जगातले सर्वात मोठे यूनिट त्यांनीच स्थापन केले. त्यांनी ‘एचटीपीबी’ हे घन इंधन विकसित करून तीस वर्षे उलटली. परंतु आजही ते जगातले सर्वाधिक अद्ययावत इंधन मानले जाते.

१९७९ मध्ये डॉ. गोवारीकर विक्रम साराभाई अवकाश संशोधन केंद्राचे संचालक झाले. १९८७ ते १९९३ या काळात ते भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव तसेच पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते. हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी त्यांच्या टीमने जे मॉडेल विकसित केले, ते ‘गोवारीकर मॉडेल’ म्हणून ओळखले जाते.
त्याचा उपयोग दरवर्षी हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी केला जातो.

पीएमचे सल्लागार
पॉलिमर केमिस्ट्रीमधील त्यांचे संशोधन जगभर गाजले. भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रात त्यांनी डॉ. साराभाईंप्रमाणेच मोलाचे योगदान दिले. चार पंतप्रधानांसोबत त्यांनी वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम केले. राजीव गांधी, व्ही. पी. सिंग, चंद्रशेखर आणि पी. व्ही. नरसिंहराव यांनी डॉ. गोवारीकरांचे शास्त्रज्ञ म्हणून महत्त्व जाणले.

‘आय प्रेडिक्ट’चे लेखक
डॉ.गोवारीकरांच्या नेतृत्वाखाली १९८३ मध्ये ‘एसएलव्ही ३’ ही यान मोहीम यशस्वी झाली. १९९४ ते २००० दरम्यान त्यांनी मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्षपद भूषवले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ते माजी कुलगुरू होते. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. भारतीय लोकसंख्येवर भाष्य करणारे ‘आय प्रेडिक्ट’ हे पुस्तक गाजले. पद्मश्री, फाय फाऊंडेशन, विविध विद्यापीठांनी त्यांना मानद डॉक्टरेट दिली होती.