आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Maharashtra Cricketer Hemant Kanitkar Passes Away In Pune

माजी कसोटीपटू हेमंत कानिटकर यांचे पुण्यात निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- माजी कसोटीपटू व यष्टीरक्षक हेमंत कानिटकर यांचे प्रदीर्घ आजाराने मंगळवारी रात्री पुण्यात निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगे ऋषिकेश आणि आदित्य असा परिवार आहे. हृषिकेश कानिटकर हा त्यांचा मुलगाही भारतीय क्रिकेट संघाकडून खेळला आहे.
कानिटकर यांनी 1963-64 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 15 वर्षे महाराष्ट्राकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेल्या कानिटकरांनी पदार्पणातच सौराष्ट्रविरूद्ध शतक झळकावले. फक्त दोनच कसोटी सामन्यात त्यांना भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. 1970-71च्या रणजी सामन्यात कानिटकर यांच्या कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राला अंतिम फेरीत धडक मारता आली. त्यामुळे वेस्ट इंडिजविरोधातील कसोटी सामन्यासाठी त्यांची भारतीय संघात निवड करण्यात आली होती. त्या कसोटीत तिस-या क्रमांकावर खेळताना कानिटकर यांनी 65 धावा केल्या होत्या.
आपल्या दीड दशकांच्या कारकिर्दीत कानिटकर यांनी 42.79 च्या सरासरीने 5007 धावा केल्या. यामध्ये 13 शतकांचा समावेश होता. त्यांचा मुलगा हृषिकेश कानिटकर हा भारतीय संघाकडून 2 कसोटी आणि 34 एकदिवसीय सामने खेळला आहे.