आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Pune District Shivsena Head Umesh Chandgude Left The Party

पुणे: माजी जिल्हाप्रमुख उमेश चांदगुडे, सोनावणेंचा शिवसेनेला \'जय महाराष्ट्र\'!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख (शिरूर लोकसभा मतदारसंघ) उमेश चांदगुडे आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव सोनावणे यांनी आज शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. शिरूर लोकसभा मतदारसंघातील खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्याशी वितृष्ट आल्याने चांदगुडे यांनी पक्ष सोडल्याचे सांगण्यात येत आहे.
चार वर्षापूर्वी चांदगुडे यांना शिवसेनेत आढळराव-पाटलांनीच आणले होते. तसेच त्यांच्या आग्रहाखातरच त्यांना शिरूर लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख केले होते. मात्र चांदगुडे आणि आढळराव पाटलांत मागील काही दिवसापासून पटत नव्हते. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर चांदगुडे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांच्यासोबत शिवाजीराव सोनावणे यांनीही पक्ष सोडला आहे.
काही दिवसापूर्वी खेडचे शिवसेना नेते अशोक खांडेभराड यांनीही आढळराव यांच्याशी मतभेद झाल्याने पक्ष सोडला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आढळराव-पाटलांना धक्का बसल्याचे मानण्यात येत आहे.