आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्‍यात दफनभूमीची भिंत कोसळून चार ठार, दोन जण जखमी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - येरवडा येथील दफनभूमीची संरक्षक भिंत जवळच असलेल्या घरावर कोसळून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला, तर दोन महिला जखमी झाल्या.


आनंदा नामदेव भिलोरे (70), सुधाकर आनंदा भिलोरे (40), अक्षय सुधाकर भिलोरे (12) व पल्लवी सुधाकर भिलोरे (8) अशी मृतांची नावे आहेत. संगीता सुधाकर भिलोरे (35) व लीलाबाई ऊर्फ शांताबाई भिलारे (60) यांच्यावर उपचार सुरू आहेत. भिलोरे कुटुंब मूळचे जळगाव जिल्ह्यातील कापूसवाडी (ता. जामनेर) येथील आहे. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास पावसामुळे दफनभूमीची भिंत भिलोरे यांच्या घरावर कोसळली. त्यामुळे गुदमरून घरातील दोन पुरुष व दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. याबाबत येरवडा पोलिस चौकीत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक ए.बी. अहिरराव करत आहेत.