आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ईव्हीएम हॅकिंग’साठी चार तास अपुरे: चव्हाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना ‘ईव्हीएम मशीन हॅक करून दाखवा’ असे चॅलेंज दिले, मात्र ते स्वीकारण्यासाठी व तपासण्यासाठी अवघ्या चार तासांचा वेळ दिला. हा अवधी अत्यल्प असल्याने केवळ अकॅडेमिक इंटरेस्ट या भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हे आव्हान स्वीकारले आहे,’ असे स्पष्टीकरण पक्षाच्या राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांनी शनिवारी  दिले.
 
निवडणूक अायाेगाने दिलेले ईव्हीएम  हॅकिंगचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसने स्वीकारले अाहे. त्या टीममध्ये चव्हाण यांचा समावेश अाहे. मात्र हॅकिंगसाठी दिलेला चार तासांचा कालावधी अपुरा असल्याने पक्षाने केवळ रचना समजून घेण्याच्या उद्देशाने हे आव्हान स्वीकारल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...