आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Four IT Person Missing Issue Pune, One Death Body Found In Neera River

पुण्यातील बेपत्ता चौघांपैकी एकाचा मृतदेह नीरा नदीत सापडला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- कर्नाटक, गोवा, महाबळेश्वर येथे फिरण्यासाठी निघालेल्या चौघांपैकी एकाचा मृतदेह पुणे- सातारा रस्त्यावरील सारोळा गावाजवळील नीरा नदीच्या काठावर बुधवारी सकाळी सापडला. चिंतन बुच (29) मृताचे नाव आहे. त्यांच्यासोबत असलेले प्रणव लेले , साहिल कुरेशी व र्शृतिका चंदवाणी यांचा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकामार्फत नदीपात्रात शोध घेतला जात आहे.

प्रणव लेले व त्याचे तीन साथीदार हे पॅराडाईज या जाहिरात कंपनीत कार्यरत असून ते बेपत्ता झाल्याची तक्रार अशोक लेले यांनी कोथरुड पोलिस चौकीत 3 नोव्हेंबर रोजी दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा तपास केला असता आय-20 कार ही खेड-शिवापूर टोल नाक्यावर दोन नोव्हेंबर रोजी रात्री दोन वाजून 20 मिनिटांनी पास झाल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यांचे मोबाइल लोकेशन तपासले असता कापूरहोळ येथे त्यांचे शेवटचे लोकेशन निदर्शनास आले. कोल्हापूर, सातारा, वरंधा घाट, खंबाटकी घाट येथे पोलिसांनी पथके रवाना करून चौघांचा शोध घेतला. बुधवारी सकाळी चिंतन याचा मृतदेह नीरा नदीत सापडला.

अति मद्य प्रशनाने मृत्यू ?
चौघांची कार नदीत बुडाल्याची शक्यता आहे. एनडीआरएफच्या जवानांमार्फत त्यांचा शोध घेतला जात आहे. कोथरुड येथील त्यांच्या फ्लॅटमध्ये पोलिसांना दारूच्या बाटल्या आढळल्या. अति मद्यप्राशन करून कार चालवल्याने चौघांचा मृत्यू झाला आहे का? या दृष्टीने तपास केला जात आहे. सध्या शोधमोहीम थांबवण्यात आली असून गुरुवारी सकाळी पुन्हा सुर केली जाईल, जाईल, असे पुण्याचे पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी सांगितले.