आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Four Killed In Jerusalem Synagogue Attack, Pune\'s 44 Tourist Safe

VIDEO: इस्त्रायलमध्ये दहशतवादी हल्ला, सतिश देसाईंसह पुण्यातील 44 पर्यटक सुखरूप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- जखमींना रूग्णालयात उपचारासाठी नेताना सुरक्षारक्षक...)
सिनेगॉग, जेरुसलेम- इस्त्रायलमधील सिनेगॉग शहरात आज सकाळी दोन दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करीत हल्ला केला. या हल्ल्यात 4 जणांचा मृत्यू झाला तर दोन पोलिसांसह सहा जण जखमी झाले आहेत. गोळीबार करणा-या दोन्ही दहशतवाद्यांना इस्त्रायलच्या लष्करी जवानांनी ठार मारले आहे. दरम्यान, ही घटना घडत असतानाच घटनास्थळाजवळच पुण्यातील काँग्रेस नेते सतिश देसाई यांच्यासह 44 पर्यटक उपस्थित होते. मात्र, सुदैवाने त्यांना कोणतीही झळ बसली नाही. आम्ही सर्व जण सुरक्षित असल्याचे व ठरल्यानुसार नियोजित ठिकाणी पर्यटनाला जात आहोत असे सतिश देसाई यांनी वृतवाहिन्यांवर बोलताना सांगितले.
इस्त्रायलची राजधानी जेरूसलेमपासून सिनेगॉग हे शहर जवळच आहे. सिनेगॉग शहरात ज्यू धर्मियांचे प्रार्थनास्थळ आहे. त्यामुळे तेथे ज्यू लोकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. याचबरोबर विदेशातील अनेक लोकही तेथे पर्यटनाला येत असतात. आज सकाळी दोन दहशतवाद्यांनी बंदुकीसह तेथील मुख्य रस्त्यावर अचानकपणे अंदाधुंद गोळीबार सुरु केला. यात प्रार्थनास्थळी निघालेल्या चार ज्यू लोकांचा मृत्यू झाला. तर, या घटनेत दोन पोलिसांसह सहा जण जखमी झाले आहेत. हे दोन्ही दहशतवादी मुस्लिम असण्याची शक्यता आहे. 'अल्लाहू अकबर' असे हे दोघे दहशतवादी ओरडत होते व त्याच स्थितीत त्यांनी बेछुट गोळीबार केला. त्यांच्याजवळ धारदार शस्त्रे, कु-हाड, चाकू आढळून आले. दरम्यान, लष्कराच्या जवानांनी या दोघांचा खात्मा केला.
इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानयाहू यांनी पॅलेस्टिनीमधील हमास या दहशतवादी संघटनेला जबाबदार धरले आहे. या हल्ल्याला पॅलेस्टियनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्या आशिर्वादामुळेच हे हल्ले करण्यात येत आहेत. ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळावर हल्ला करून पॅलेस्टिनी लोक धर्मावर आधारित हल्ले करीत असल्याचे नेत्यानयाहू यांनी म्हटले आहे.
मागील काही दिवसापूर्वी झालेल्या एका दहशतवादी हल्ल्यात 5 इस्त्राईल नागरिकांसह एका विदेशी पर्यटकाचा मृत्यू झाला होता. गेली अनेक वर्षे इस्त्राईल आणि पॅलेस्टियन यांच्यात धर्मिय व राजकीय संघर्ष सुरु आहे.
पुढे पाहा, या हल्ल्यातील छायाचित्रे... आणि व्हिडिओ...