आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्‍यात कार चोरणारे चार आरोपी ‘जीपीएस’च्या मदतीने गजाआड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - कार चालकास चाकूचा धाक दाखवून गाडी चोरून नेणा-या चार चोरट्यांना कारमधील जीपीएस सिस्टिमच्या मदतीमुळे जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. ललित दीपक खोल्लम (वय 25, रा. पुणे), राहुलाल नंदलाल राजपूत (मु. उत्तर प्रदेश), दत्ता बनसोडे (रा. उत्तर प्रदेश) व आदेश भारती (रा.उत्तर प्रदेश) अशी आरोपींची
नावे आहेत.


गणेश बाबूराव रणखांब (23) या कारचालकाने याबाबत सांगवी पोलीस चौकीत तक्रार दाखल केली होती. तो एका कंपनीत सेक्युरिटीचे काम करत असून तो पिकअपसाठी चिखलीकडे जात होता. सांगवी फाटा येथे लघुशंकेकरिता थांबला असता चार आरोपींनी चाकू व कोयत्याच्या धाक दाखवून बळजबरीने त्याच्या गाडीत बसले. कासारसाई येथील डोंगराळ भागात गाडी नेऊन त्याला मारहाण केली. तसेच त्याच्याजवळील कार, 41 हजार रुपये रोख, दोन मोबाईल, चांदीची अंगठी असा एकुण साडेचार लाख रुपयांचा माल पळवून नेला. सांगवी पोलीसांनी कारमधील जीपीएस सिस्टिमच्या आधारे आरोपींना माग घेऊन
चौघांनाही अटक केली.