आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांधकाम व्यावसायिक अविनाश भाेसलेंवर फसवणुकीचा गुन्हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भाेसले यांच्यासह सहा जणांवर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी राजेश बजाज यांनी फ‍िर्याद दिली अाहे. अविनाश भाेसले , अमित अविनाश भाेसले, भागीदार रवींद्र धाेंडिराम शिंदे, रामसीता भुवनेश्वरी, विकासक रणजित माेहिते व अार्क्टिकेट स्वप्निल देशपांडे अशी अाराेपींची नावे अाहेत.
शिवाजीनगर परिसरातील यशवंत घाडगेनगरमध्ये अविनाश भाेसले यांनी एबीअायएल हाऊसची प्रशस्त इमारत उभारून कार्यालय थाटले अाहे. सदर जमीन ही अाराेपींनी बळकावल्याचा अाराेप त्यांचेवर करण्यात अाला अाहे.

याबाबत राजेश खरातीलाल बजाज यांनी पाेलिसांकडे फ‍िर्याद दिली. बजाज यांनी सदर जमीन ही अापली वडिलाेपार्जित जमीन असून ती एका मध्यस्थामार्फत भाेसले यांनी बळकावल्याचा दावा केला अाहे. तसेच सदर जागेचे नकाशे हे पुणे महानगरपालिकेत बदलण्यात अाल्याचे सांगितले. याबाबत बजाज यांनी लाेकशाही ग्रुपची स्थापना करून त्यामार्फत पुणे न्यायालयात फाैजदारी दावा दाखल केला. अेबीअायएल हाऊस या नावाने प्रसिद्ध असलेले स.क्र.१३२ ब शिवाजीनगर यांचे मिळकतीसंबंधी शासननिर्णय १२ जून १९५१ च्या अटींचा भंग झाल्याचे निदर्शनास अाणून दिले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने याप्रकरणी सुनावणी घेऊन राजेश बजाज यांची फ‍िर्याद दाखल करून घेतली. तसेच चतुशृंगी पाेलिस निरीक्षक यांना याप्रकरणी जमिनीचे मूळ मालक, विकासक व विकासकांचे भागीदार व अार्किटेक्ट यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे अादेश दिले.
बातम्या आणखी आहेत...