आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांनो, पुस्तक वाचाल तर मिळेल बक्षीसही !, ग्रंथालयाची नवी योजना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - मुलं हल्ली वाचत नाहीत, ही ओरड सर्वत्र होत असते. यावर उपाय म्हणून ‘पुस्तकं वाचा, बक्षिसे घेऊन जा,’ अशी योजनाच पुण्यातील ग्रंथालयाने खास बालकांसाठी सुरू केलीय.

पुण्यातील महात्मा फुले पेठेत श्रमदान मारुती मंडळ ग्रंथालय आहे. मराठा महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांच्याकडे या ग्रंथालयाची सूत्रे आहेत. ८ ते १५ वयोगटातील मुलांनी ग्रंथालयात यावे किंवा घरी नेऊन पुस्तके वाचावीत यासाठी कोंढरे यांनी बक्षीस योजना सुरू केली आहे. ‘बक्षिसासाठी तरी मुले ग्रंथालयात येतील आणि पुस्तके उघडतील. बालपणी वाचनप्रेम रुजले की मग भविष्यात बक्षीस न देताही ही मुले पुस्तकप्रेमी होतील,' असे कोंढरे म्हणाले. या उपक्रमामुळे रोज किमान शंभर मुले तरी येतील, अशी अपेक्षा त्यांना आहे. या ग्रंथालयाकडे दहा हजार पुस्तके आहेत. याशिवाय मुलांसाठीची मराठी-इंग्रजी पुस्तके नव्याने खरेदी करण्यात आलीत. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, माहितीकोश, आत्मचरित्रे, व्यक्तिमत्त्व विकास, स्पर्धा परीक्षा, करिअर घडवण्यासाठीची पुस्तके उपलब्ध करून देण्यात अाली अाहेत.

बुलडाण्यातून मिळाली प्रेरणा
^"पुस्तक वाचा आणि दहा रुपये घेऊन जा’ असा उपक्रम बुलडाण्यात एक जणाकडून राबवला जात असल्याचे मला माहीत होते. ते गृहस्थ रोज २५ जणांना प्रत्येकी दहा रुपये द्यायचे. यावरूनच मी प्रेरणा घेतली. फक्त पैशांऐवजी मुलांना शालेय साहित्य बक्षीस म्हणून देण्याचे ठरवले अाहे.

राजेंद्र कोंढरे