आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजिंठा-वेरूळ परिसरात माेफत वाय-फाय सुविधा; रजिस्ट्रेशन करावे लागणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- एेतिहासिक प्रेमाचे प्रतीक असणारी अाग्र्यातील ताजमहाल परिसरात नुकतीच माेफत वाय- फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात अाली अाहे. त्याच धर्तीवर अाता जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश असणाऱ्या एेतिहासिक अजिंठा- वेरूळ लेण्यांचा परिसरातही येत्या दाेन महिन्यांत माेफत वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार अाहे. विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी बीएसएनएलच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जात अाहे.

देशातील एेतिहासिक ठिकाणांसह महत्त्वपूर्ण छाेट्या-माेठ्या शहरांतील ४० हजार सार्वजनिक ठिकाणी सन २०१८ पर्यंत वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्याचे केंद्र सरकारचे ध्येय अाहे. त्यासाठी सहा हजार काेटींचा प्रकल्प अाखण्यात अालेला अाहे. या ठिकाणांमध्ये पर्यटनस्थळे, न्यायालये, उद्याने, प्रसिद्ध मंदिरे, रुग्णालये, महाविद्यालये, बसस्थानके, शाॅपिंग माॅल यांचा समावेश अाहे.

पुण्यातील वाय-फाय साॅफ्ट साेल्युशन या कंपनीच्या तांत्रिक साहाय्याच्या माध्यमातून, बीएसएनएलचे मुख्याधिकारी अनुपम श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली अातापर्यंत देशातील ४० शहरांत १२० जागी अशा प्रकारची सुविधा पुरवण्यात अाली अाहे, तर वर्षाअखेरीपर्यंत देशभरातील २५० एेतिहासिक ठिकाणी ही सुविधा उपलब्ध हाेणार अाहे. या सेवेचा अातापर्यंत चार लाख लाेकांनी वापर केला असून दैनंदिन सुमारे १० हजार लाेक या सुविधेचा वापर करत अाहेत.

महाराष्ट्रात इथे मिळणार सुविधा
मुंबईतील चाैपाटी बीच, हँगिग गार्डन, जुहू बीच, नागपूर येथील रामधाम, फुटवाडा लेक, महाराजा बाग, नागपूर महापालिका,राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज विद्यापीठ, विदर्भ क्रिकेट असाेसिएशन मैदान, अजिंठा-वेरूळ.
देशभरात उपलब्ध साेय
ताजमहाल, सारनाथ मंदिर, काेणार्क मंदिर, खजुराहाे, काेचीचा किल्ला, हैदराबाद येथील ब‍िर्ला मंदिर, हुसेन सागर, चारमिनार, वाराणसी घाट.

६५ हजार माेबाइलचे रजिस्ट्रेशन
वाय-फाय साॅफ्ट साेल्युशनचे संचालक ऋषिकेश घारे यांनी सांगितले की, प्रत्येक नागरिकाला माेबाइलवर इंटरनेट सुविधा घेणे शक्य नसते. मात्र, तरीही एेतिहासिक ठिकाणी गेल्यानंतर त्यांना सदर वास्तूबाबतची माहिती तत्काळ वाय-फायचा वापर करून घेता येर्इल. देशी-परदेशी पर्यटकांना प्राेत्साहित करण्यासाठी वाय-फायची सुविधा सुरुवातीच्या अर्धा तास माेफत िदली जाणार असून त्यानंतरच्या वापरावर बीएसएनएलने ठरावीक दराची अाकारणी केली अाहे. एका महिन्यात तीन वेळा या माेफत सेवेचा लाभ घेता येईल. मात्र, त्यासाठी पर्यटकांना अापला माेबाइल रजिस्टर करावा लागेल, त्यानंतर त्वरित व्हेरिफिकेशन हाेऊन त्यांना वाय-फाय सेवा उपलब्ध करून दिली जार्इल. अातापर्यंत अशा प्रकारे ६५ हजार माेबाइलचा रजिस्ट्रेशन डाटा तयार झाला अाहे.