आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेवताना दोन मित्रांत पाण्‍यावरून वाद, एकाने केली दुसऱ्या हत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - मोशी परिसरात एका मित्रानेच दारूच्‍या नशेत मित्राच्‍या डोक्‍यात दगड घालून खून केल्‍याची घटना आज (सोमवारी) उघकीस आली. राजू राठोड असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी वामन राजपुरे या त्याच्या मित्राला अटक केली आहे.
अशी घडली घटना
राजू आणि वामन हे दोघे कचरा वेचून तो विकण्‍याचे काम करतात. रविवारी रात्री दोघांनी दारू प्‍याली. नंतर मोशी येथील प्राधिकरणाच्या मोकळ्या मैदानात ते जेवण करण्यासाठी बसले. मात्र, पिण्‍यासाठी पाणी कोण आणणार, या क्षुल्‍लक कारणावरून दोघांमध्‍ये वाद झाला. यात वामन याने राजू याच्या डोक्यात दगड घातला. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या राजुचा जागीच मृत्यू झाला.