पुणे- त्या दोन मित्रासह त्यांच्या ग्रुपमधील मित्रांनी गुरूवारी रात्री भेटायचे ठरले. माझ्या घरीच या आल्यावर गप्पा मारू असे ठरले. ते सर्व जण गुरुवारी रात्री आठच्या सुमारास त्याच्या घरी दाखल झाले. गप्पा सुरु झाल्या अन् तुझे रिव्हॉल्वर बघू म्हणत त्याने तो हातात घेतला आणि तो हाताळताना त्याच्याकडून चुकून गोळी झाडली गेल्याने जिवलग मित्राचाच जीव गेला. अशी घटना घडली आहे पिंपरी-चिंचवड शहरातील अजमेरा कॉलनीत.
नंदकुमार प्रल्हाद जोशी (34, अजमेरा कॉलनी, पिंपरी) असे या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मित्राचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी राजन पटेल (33, अजमेरा कॉलनी, पिंपरी) याला कलम 304 नुसार अटक केली आहे. सुधाकर जोशी (63, एरंडवणा, पुणे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
याबाबतची माहिती अशी की, नंदकुमार आणि राजन हे दोघे व्यावसायिक मित्र असून ते दोघे त्यांच्या इतर मित्रांसमवेत अजमेरा कॉलनीतील निवेश सोसायटीत काल रात्री एकत्र जमले होते. त्यावेळी राजन पटेल यांनी त्याच्याकडे असलेल्या रिव्हॉल्वरच्या परवान्याचे नूतनीकरण नुकतेच करून आणले होते. त्यावेळी राजन नंदकुमारसह सर्व मित्रांनी दाखव असे सांगितले. रिव्हॉल्वरमध्ये गोळ्या भरलेल्या होत्या. राजन नंदकुमारला रिव्हॉल्वर देत असताना चुकुन चाप ओढला गेल्यामुळे गोळी थेट नंदकुमारच्या छातीत घुसली.
पुढे वाचा, हा अपघात की घातपात....