आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • From 1 February Gansarswati Festivel For Puneites

एक फेब्रुवारीपासून पुणेकरांसाठी गानसरस्वती महोत्सवाची मेजवानी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - नाट्यसंपदा प्रतिष्ठानतर्फे पुण्यात एक व दोन फेब्रुवारी दरम्यान गानसरस्वती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बुजुर्ग आणि उदयोन्मुख कलावंतांचा स्वराविष्कार या महोत्सवात होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि प्रसिद्ध गायक रघुनंदन पणशीकर यांनी मंगळवारी दिली.
पहिल्या दिवशी तेजश्री आमोणकर यांचे गायन होईल. तेजश्री या किशोरी आमोणकर यांच्या शिष्या आहेत. त्यानंतर आरती अंकलीकर यांचे गायन होणार आहे. पहिल्या दिवसाची सांगता उस्ताद शाहीद परवेझ यांच्या सतारवादनाने होईल. महोत्सवाचे दुसरे सत्र दोन फेब्रुवारीला सकाळी आठ वाजता युवा गायिका धनाश्री घैसासच्या गायनाने सुरू होईल. धनाश्री यांना डॉ. अश्विनी भिडे देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यानंतर प्रसिद्ध वीणावादक जयंती कुमरेश यांचे वादन व नंतर ज्येष्ठ गायक पंडित उल्हास कशाळकर यांचे गायन होईल. तिस-या सत्राची सुरवात रघुनंदन पणशीकर यांच्या गायनाने होईल. त्यानंतर पं. शिवकुमार शर्मा यांचे संतूरवादन होईल आणि महोत्सवाची सांगता गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या गायनाने होईल. पुण्यात घरकुल लॉन्स येथे हा महोत्सव रंगेल.