आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: गजेंद्र चाैहानांच्या ‘FTII’ वरील नियुक्तीला विद्यार्थ्यांचा विराेध, आंदोलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी अभिनेता गजेंद्र चाैहान यांच्या निवडीला तीव्र विराेध सुरू झाला अाहे. गजेंद्र चौहान भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत व पक्षाचा कार्यकर्ता अशा महत्त्वाच्या संस्थेवर असू नये अशी विद्यार्थ्यांची भूमिका आहे. या निवडी विरोधात संस्थेतील विद्यार्थ्यांनी अांदाेलन सुरू केले अाहे. तर संस्थेचे सदस्य अासाममधील चित्रपट निर्माते जाहनू बरुअा यांनी ‘अशा प्रतिष्ठित संस्थेची धुरा कणखर व्यक्तीकडेच असावी,’ असे परखड मत व्यक्त केले अाहे.
चौहान यांच्या नियुक्तीला विरोध करत एफटीआयच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी जोरदार निदर्शने केली. विद्यार्थ्यांच्या मते, चौहान यांची नियुक्ती राजकीय हेतूने प्रेरित आहे. ‘चौहान यांच्या नियुक्तीमागे आरक्षणाचा मुद्दा होता काय?’ या प्रश्नावर बरुअा म्हणाले, ‘आरक्षण हा एक मुद्दा असू शकतो. त्यामुळेच तर आंदोलन सुरू आहे. चौहान हे संस्थेचे माजी विद्यार्थी असले अाणि अभिनय क्षेत्रात त्यांनी प्रतिष्ठा मिळवलेली असली तरीसुद्धा संस्थेसाठी आवश्यक कणखरपणा त्यांच्यात नाही. त्यांचा संस्थेशी केवळ भावनात्मक संबंध आहे.’ दरम्यान, चाैहान यांनी बरुअा यांच्या टीकेवर काेणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

अाधी जाणून तर घ्या- गजेंद्र चौहान

अांदाेलनाबाबत चौहान म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्यापूर्वी माझी उपयुक्तता काय आणि संस्थेच्या सेवेसाठी मी काय करू शकतो, निदान हे तरी जाणून घ्यायला हवे. याप्रकरणी अापण लवकरच विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांचा गैरसमज दूर करणार अाहाेत.’
पुढे पाहा, एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाचे फोटोज...