आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FTII: केंद्रीय पथकासोबत सकारात्मक चर्चा, तोडगा निघण्याची विद्यार्थ्यांना आशा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) विद्यार्थ्यांना संपाच्या 71 व्या दिवशी आशेचा किरण दिसला आहे. शुक्रवारी केंद्रीय पथकासोबत झालेली चर्चा सकारात्मक झाली असल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. त्रिसदस्यीय समिती चर्चेचा अहवाल सोमावारी मंत्रालयाला देणार आहे.

गुरुवारी विद्यार्थ्यांनी या प्रकरणात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लक्ष घालण्याचे साकडे घातले होते. विद्यार्थ्यांच्या मूळ न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठीच विद्यमान संचालक पोलिसांची मदत घेत आहेत, असा आरोपही विद्यार्थ्यांनी केला होता. दरम्यान शुक्रवारी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या तीन सदस्यांच्या समितीने संस्थेला भेट देऊन सर्व प्रश्नांची माहिती घेतली. पथकाचे प्रमुख खान यांनी व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले. तर विद्यार्थ्यांनीही केंद्रीय पथकासोबत आशादायक चर्चा झाल्याचे म्हटले आहे. विद्यार्थ्यांनी 71 दिवसांपासून सुरु असलेल्या 'महाभारता'चा शेवट होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. गजेंद्र चौहान यांची नियुक्ती रद्द करण्यात यावी ही विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे.