आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • FTII Pune Students Start A One Day Hunger Strike In Protest

PHOTOS: रोहितच्या आत्महत्येविरोधात मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूरात आंदोलन!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- हैदराबादमधील सेंट्रल यूनिवर्सिटी (एचसीयू)त पीएचडी करत असलेल्या रोहित वेमुला (26) याने आत्महत्या केल्याच्या निषेधार्थ पुण्यातील एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांनी या घटनेस जबाबदार असलेल्या केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली आहे. दरम्यान, मुंबईसह औरंगाबाद, नागपूर आदी विद्यापीठ व शहरातही रोहित वेमुलाच्या हत्येविरोधात आंदोलन करण्यात येत आहे.
रोहितने का केली आत्महत्या...
- आंध्र प्रदेशातील गुंटूरचा रहिवासी असलेला दलित विद्यार्थी रोहित समाजशास्त्र विषयात पीएचडी करीत होता.
- माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, रोहित याच्यासह आंबेडकर यूनियनच्या पाच दिलत विद्यार्थ्यांनी भाजपची विद्यार्थी संघटना एबीव्हीपीच्या एका कार्यकर्त्यावर ऑगस्ट महिन्यात हल्ला केल्याचा आरोप आहे.
- विद्यापीठाने केलेल्या प्राथमिक चौकशीत या पाच जणांना निर्दोष सोडून दिले होते. मात्र, 21 डिसेंबर रोजी त्यांना निलंबित करण्यात आले व हॉस्टेलमध्ये राहण्यास निर्बंध घातले.
- या कारवाईमागे केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी दबाव आणल्याचा बोलले जात आहे.
- विद्यापीठाच्या या निर्णयाने आंबेडकर स्टूडंट यूनियनच्या समर्थनार्थ रविवारी 10 संस्था, संघटनांनी एक दिवस लाक्षणिक उपोषण केले होते.
- त्याच दिवशी रोहितने फाशी घेतली व आत्महत्या केली. पोलिसांना त्याच्या खोलीत 5 पानी सुसाईट नोट सापडली.
आतापर्यंत चौघांविरूद्ध गुन्हे दाखल
- केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय आणि विद्यापीठाचे कुलगुरु पी अप्पा राव यांच्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
- सोमवारी देशभर या घटनेचा विरोध झाला, आंदोलन केले. दिल्लीत जेएनयू स्टूडंट्सनी स्मृती ईरानी यांच्या घराबाहेर निदर्शने केली. यादरम्यान, लोकांनी पोलिसांवरही दगडफेक केली.
पुढे वाचा, काय घडले होते ऑगस्टमध्ये, वाचा शेवटच्या स्लाईडवर त्याआधी पाहा वेगवेगळ्या झालेले आंदोलन..