आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ftii Students To End Unger Strike After Ib Ministry Replies To Their Letter

एफटीआयआयच्‍या विद्यार्थ्‍यांचे उपोषण सुटले, सरकारने दिले चर्चेचे निमंत्रण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फळाचा रस पिऊन उपोषण सोडताना विद्यार्थी. - Divya Marathi
फळाचा रस पिऊन उपोषण सोडताना विद्यार्थी.
पुणे - भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदावरून गजेंद्र चौहान यांना हटवावे, या मागणीसाठी एफटीआयआयचे तीन विद्यार्थी 17 दिवसांपासून बेमुदत उपोषण बसलेले होते. त्‍यांना आज (रविवार) केंद्रीय माहिती व परराष्ट्र मंत्रालयाने चर्चेसाठी निमंत्रणाचा मेल पाठवला. त्‍यामुळे या उपोषणाची सांगता झाली असून, 29 सप्‍टेंबरला चर्चा होणार आहे.

गजेंद्र चौहान यांना अध्यक्षपदावरून हटविण्यासाठी एफटीआयआयमधील विद्यार्थी गेल्या साडेतीन महिन्‍यांपासून आंदोलन करत आहेत. मात्र, केंद्र सरकार कोणतीही कारवाई न करता आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्‍याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. दरम्‍यान, या उपोषण आंदोलनापूर्वी फटीआयआयमधील अभिजीत दास या विद्यार्थ्याने 66 तास उपोषण केले होते. पण, त्याची प्रकृती बिघडल्याने उपोषण सोडावे लागले. त्‍यानंतर हिमांशू शेखर, चेतस देसाई आणि अभिषेक झा हे विद्यार्थीही उपोषणास बसले होते. त्‍यांचे उपोषण आता सुटले आहे.

उपोषण सोडले, बंद कायम
रविवारी सकाळी 11 वाजता मंत्रालयाकडून आम्‍हाला ई-मेल आला. त्‍यात चर्चेचे निमंत्रण देण्‍यात आले आहे. त्‍यामुळे आम्‍ही हे उपोषण मागे घेत आहेत. मात्र, बंद कायमच आहे, अशी प्रतिक्रिया विकास अर्स या विद्यार्थ्‍याने दिली.
विद्यार्थ्यांनीच पाठवले होते सरकारला पत्र
चर्चेचे अनेक प्रयत्न असफल ठरल्यानंतर आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे सरकारने जवळपास दुर्लक्ष केल्यानंतर एफटीआयआयचे आंदोलनकर्ते विद्यार्थीच एक पाऊल मागे घेत सरकारने चर्चेसाठी वेळ आणि तारीख मागितली होती. शिवाय सरकार चर्चेस तयार झाले तर उपोषण आंदोलन मागे घेतले जाईल, असेही त्‍यात म्‍हटले होते. त्‍या आधारे मंत्रालयाने चर्चेच्‍या निमंत्रणाचा मेल पाठवला आहे.