आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अांदाेलक विद्यार्थ्यांविरोधात एफटीआयआयची तक्रार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- विद्यार्थ्यांनी केबिनमध्ये येऊन धमकावत अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी एफटीआयआयचे रेडिओ व्यवस्थापक संजय चांदेकर यांनी अांदाेलक विद्यार्थ्यांविराेधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शिवाय, त्यांनी या विद्यार्थ्यांपासून धोका असल्याचे सांगत संरक्षणही मागितले आहे.

‘एफटीआयआयमध्ये नव्या नियामक मंडळाच्या नियुक्त्यांना विद्यार्थ्यांचा विरोध आहे. मात्र, नव्या मंडळींना किमान एक वर्ष काम करण्याची संधी दिली जावी, असे आवाहन आम्ही विद्यार्थ्यांना केले होते. परंतु माध्यमांना माहिती देण्यापूर्वी आमची परवानगी का घेतली नाही, अशी अरेरावीची भाषा वापरत विद्यार्थी अंगावर धावून आले,’ असे तक्रारीत म्हटले अाहे.