आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fundry, Papuza Film Got Excellent Award In Pune International Film Festivel

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात फँड्री, पापुझा चित्रपटाने मारली बाजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या स्पर्धात्मक विभागात फँड्री या चित्रपटाने बाजी मारली असून सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा संत तुकाराम पुरस्कार मिळवला आहे. जागतिक स्पर्धा विभागातील प्रभात पुरस्काराचा मान जिप्सींचे जगणे मांडणा-या पापुझा या पोलिश चित्रपटाने मिळवला आहे. फँड्री या चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, छायालेखक विक्रम अमलदी तर अभिनेता मास्टर सोमनाथ अवघडे सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला आहे. प्रेक्षकांच्या पसंतीची मोहोरही फँड्रीवरच उमटली आहे. एकूणच समाजाच्या मुख्य प्रवाहापेक्षा निराळे जगणे मांडणा-या चित्रपटांनी पारितोषिकांमध्ये ठसा उमटवला आहे.
समारोप समारंभात हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. जागतिक स्पर्धा विभागात पापुझा या पोलिश चित्रपटाने प्रभात पुरस्कार मिळवला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार पापुझाच्या जोना क्रॉस क्राऊझे व क्रझिस्तोफ क्राऊझे यांना तसेच इटलीच्या मिर्को मोकॅटेली यांना विभागून देण्यात आला.
समारोप समारंभाला आईसलँडचे राजदूत गुडमुंडुर एरिक्सन, इटलीच्या सांस्कृतिक विभागाच्या राजदूत पॅट्रिशिया तसेच महोत्सव संचालक डॉ. जब्बार पटेल, राज्याच्या सांस्कृतिक विभागाचे संचालक आशुतोष घोरपडे, एफटीआयआयचे संचालक डी. जे. नारायण, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय कोंडके आदी उपस्थित होते.
असे आहेत पुरस्कारप्राप्त चित्रपट
०स्पेशल ज्युरी अवॉर्ड - ए टच ऑफ सीन (चीन व जपान)
०द स्पेशल मेन्शन - हाऊस वुइथ ए ट्युरेट (युक्रेन)
०विशेष लक्षणीय अभिनेत्री - सिब्ली ब्रुनेर (रोझी)
०स्टुडंट अवॉडर्स - डेव्हिल इन द ब्लॅक स्टोन
०उत्कृष्ट दिग्दर्शन - अरविंद कुप्लीकर
०पटकथा - विद्यासागर
०अ‍ॅनिमेशन विभाग - फकीर
०बेस्ट फिल्म (आंतरराष्ट्रीय) फॉरवर्ड मार्च
०ज्युरी अवॉर्ड - ब्लू (यूएसए)
०एफटीआयआय अवॉर्ड - अभिलाष विजयन, हीर गांजावाला
०ऑडियन्स अवॉर्ड - नाइट ट्रेन टू लिस्बन आणि फँड्री