आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gajendra Chauhan To Take Charge As Ftii Chief Today But Students Protest

FTII: गजेंद्र चौहानांनी स्वीकारली सूत्रे; विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या लाठ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) या संस्थेच्या अध्यक्षपदाची सूत्रे अभिनेते गजेंद्र चौहान यांनी गुरुवारी अखेरीस स्वीकारली. मात्र, त्यांना प्रवेशद्वारापासूनच आंदोलक विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. ‘गजेंद्र चाैहान हाय हाय, गाे बॅक’च्या घाेषणा देत विद्यार्थ्यांनी त्यांना राेखण्याचा प्रयत्न केला.

नाेटीस बजावूनही विद्यार्थी अाक्रमक अांदाेलन करत असल्याने परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पाेलिसांनी अांदाेलकांवर लाठीमार केला. तसेच २५ अांदाेलकांची उचलबांगडी केली. दरम्यान, ‘मी काम करण्यासाठी येथे आलो आहे. संस्थेचे हित पाहणे हाच माझा अजेंडा असेल,’ असे चाैहान यांनी सांगितले.

एफटीआयआयचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यावर प्रथमच गजेंद्र चौहान यांचे गुरुवारी संस्थेत आगमन झाले. मात्र, त्यापूर्वीच त्यांच्याविरोधात विद्यार्थ्यांनी जोरदार निदर्शने केली. घोषणाबाजी, निषेधाचे फलक आणि नारेबाजी करत विद्यार्थ्यांनी चौहान यांचा निषेध केला. चौहान गो बॅक, तानाशाही नही चलेगी, गज्जू हमसे डरता है, गज्जू के लिये अंडे..अशा भाषेत विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या निषेधाची पूर्वकल्पना असल्याने संस्थेत सकाळपासूनच पाेलिसांचा माेठा फाैजफाटा तैनात करण्यात अाला हाेता. त्यामुळे विद्यार्थी आक्रमक होऊ लागताच पोलिसांनी हस्तक्षेप केला. गोंधळ वाढल्याने तसेच रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ लागल्यावर आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांनी लाठीमार करत ताब्यात घेतले आणि रस्ता मोकळा केला. त्यानंतर चौहान यांचे संस्थेत आगमन झाले. दरम्यान, विद्यार्थी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.

त्यांनी धक्काबुक्की सुरू केल्याने कारवाई करणे भाग पडले. कलम ६८ नुसार विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले, असे सहायक पोलिस आयुक्त तुषार दोशी यांनी सांगितले. तर आम्ही लोकशाही मार्गाने, अहिंसक पद्धतीने आंदोलन केले. पण तरीही पोलिसांनी बळाचा वापर करत आम्हाला संस्थेत प्रवेश करण्यास रोखले, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली.

राजकुमार िहराणी, सिंग, साेमय्या यांची निवड
चौहान यांच्या उपस्थितीत संस्थेच्या नियामक मंडळ, अॅकॅडमिक कौन्सिल, स्टँडिंग अँड फायनान्स कमिटी तसेच पेन्शन कमिटीच्या बैठका घेण्यात आल्या. तसेच या समितीवरील सदस्यांची नियुक्तीही करण्यात आली. नियामक मंडळाची दोन वर्षांनंतरची पहिलीच बैठक होती. सोसायटीचे सर्व सदस्य उपस्थित होते. सोसायटीच्या उपाध्यक्षपदी निर्माते बी. पी. सिंग यांची निवड करण्यात आली. नियामक मंडळासाठी राजकुमार हिराणी, बी. पी. सिंग, सतीश शहा, प्रांजल सायकिया, नरेंद्र पाठक व भावना सोमय्या यांचे नामांकन झाले. सिंग हे शैक्षणिक परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील. तसेच वार्षिक अहवाल, लेखा परीक्षण यांनाही मंजुरी देण्यात आली.