आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील \'दगडूशेठ गणपती\'च्या देखाव्यात वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- श्रीगणरायाच्या मंगल आगमनासाठी राज्यभरातील भाविक उत्सुक असून लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा फुलल्या असून खरेदीसाठी गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला नागरिकांची एकच गर्दी उसळली आहे. यंदा दगडूशेठ गणेश मंडळाने वेरूळच्या कैलास मंदिराचा देखावा उभारला आहे, तर गर्दीसाठी ५० कोटींचा विमा उतरवण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.

पुण्यातील गणेशोत्सवाची राज्यभरातील भाविकांना उत्सुकता असते. विशेषत: मानाचे पाच गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंडळ व अखिल मंडई मंडळाच्या गणेशाच्या प्राणप्रतिष्ठेविषयी साऱ्यांना जिज्ञासा असते. दगडूशेठ गणेशाची प्रतिष्ठापना सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. सायंकाळी सात वाजता लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अशोकसिंग यांच्या हस्ते दगडूशेट गणेश मंडळाच्या वेरूळ कैलास मंदिराच्या जावटीच्या विद्युत रोषणाईचे उद्घाटन होईल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.

दरम्यान दगडूशेठ गणेशासाठी मंडळाने यंदा वेरूळच्या कैलास मंदिराचा देखावा उभारला आहे. ही प्रतिकृती सात मजली आहे. दीड लाख दिव्यांची लखलखती सजावट आणि एलईडी प्रकाशझोतांच्या झगमगाटात श्रींची मूर्ती उजळणार आहे.

>९२ फूट उंच, ९० फूट लांब आणि ५२ फूट रुंदीचा हा देखावा सुमारे ६० कलाकारांच्या सहभागातून साकारला आहे.
>१.५ लाख दिव्यांचा दगडूशेठच्या देखाव्यात लखलखाट
>९२ फूट उंची
>५२ फूट रुंदी
>६० कलाकारांचे परिश्रम
गर्दीसाठी ५० कोटींचा विमा
दगडूशेठ मंदिराचा देखावा आणि श्रींचे दर्शन यासाठी उसळणाऱ्या गर्दीचा ५० कोटी रुपयांचा विमा उतरवण्यात आला आहे. मंडप परिसरात सीसीटीव्ही तसेच सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. तसेच जय गणेश निसर्ग संवर्धन अभियान सुरू करण्यात आले असून ५० लाख रोपांची लागवड करण्यात येणार आहे.