आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढच्या वर्षी लवकर या.. : चला पुण्यातील मानाच्या पाच गणपतींच्या दर्शनाला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुण्यातील मानाचे पाचही गणपतींचे विसर्जन करण्‍यात आले. संपूर्ण देशासाठी उत्सुकतेचा विषय असलेल्या पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला सकाळी साडेदहाच्या सुमारास सुरुवात झाली होती. पुण्याचे पालकमंत्री गिरिष बापट यांच्या हस्ते मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा पेठ गणपतीची आरती करण्यात आली. त्यानंतर पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.
कसबा पेठेतील बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर ठरावीक वेळेमध्ये मानाचे पाचही गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाले आहेत. अनेक पथके या मानाच्या गणपतींसमोर ढोल ताशांचा नाद करत आहेत. कसबा गणपतीपाठोपाठ मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी, तिसरा गुरुजी तालीम, चौशा तुळशीबाग आणि मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीही विसर्जनासाठी मार्गस्थ झाले आहेत. पुण्यात विसर्जन मिरवणुकीसाठी आवर्जुन येणारे गणेशभक्त आणि देशभरातील भाविकांसाठी मानाच्या या पाच गणपतींची मिरवणूक म्हणजे उत्सुकतेचा विषय असतो. या पाचही गणपतींची मिरवणूक अत्यंत पारंपरिक पद्धतीने निघत असते. चला तर मग घेऊयात मानाच्या या पाचही गणपतींचे दर्शन...
पुढील स्लाइड्सवर पाहा, मानाच्या पाच गणपतींच्या विसर्जन मिरवणुकींचे PHOTOS