आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी-चिंचवडमध्ये 15 डीजेवर पोलिसांची कारवाई; काही ठिकाणी पारंपारिक पध्दतीने बाप्पाला निरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डीजेमुळे वृध्द नागरिकांना आणि लहान मुलांना त्रास होत असून त्यावर कारवाई करण्यात येत आहे. - Divya Marathi
डीजेमुळे वृध्द नागरिकांना आणि लहान मुलांना त्रास होत असून त्यावर कारवाई करण्यात येत आहे.
पुणे- बाप्पांच्या आगमनापेक्षा विसर्जनाच्या मिरवणुकीची तयारी जोरदार होते. ढोल, ताशा आणि नवीन परंपरेनुसार डी जे वाजविण्यास तरुण नेहमीच पुढे असतात. मात्र यावर्षीपासून कोर्टाने राज्य सरकारला डी जे न वाजविण्याच्या सूचना केल्याने डी जे वर कारवाई करण्यात येत आहे.
यावर्षी 7 दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मंडळाकडून जोरदार तयारी करण्यात आली होती. पोलिसांनी मंडळांना सूचना केल्यानंतर देखील बऱ्याच मंडळांनी डी जे लावला होता मात्र पोलिस प्रशासनाने डी जे जप्त करून मंडळांवर कारवाई केली आहे.
 
डी जे लावण्यामध्ये वाकड आणि सांगवी परिसर अग्रेसर आहेत. वाकड परिसरात 9 तर सांगवी परिसरात 6 डी जे वर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये डी जेचे स्पीकर आणि वाहन ताब्यात घेतले असून कायदेशीर कारवाई मंडळांवर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्याबरोअरच भोसरी एमआयडीसीमध्ये देखील 2 डी जे वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. काही ठिकाणी ढोल ताशाच्या गजरातच बाप्पाला निरोप देण्यात आला आहे. 
 
पुढील स्लाईडमध्ये पाहा फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...