आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ganeshotsav Before Freedom Of India In British Rule

PHOTOS: स्‍वातंत्र्यापूर्वीच्‍या गणेशोत्‍सवाचे स्‍वरुप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- महाराष्‍ट्रात गणेशोत्‍सव मोठ्या उत्‍साहात साजरा करण्‍यात येतो. हजारो वर्षांपासून गणेश चतुर्थीला गणेशपूजनाची परंपरा आहे. सातवाहन, राष्‍ट्रकूट तसेच चालुक्‍यच्‍या काळात गणेशोत्‍सवाचे पुरावे आढळतात. छत्रपती शिवाजी महाराजांनीही गणेश चतुर्थीला एकात्‍मता आणि संस्‍क‍ृतिसोबत जोडून एका नव्‍या परंपरेला सुरुवात केली होती. कालांतराने गणेश चतुर्थी आणि गणेश पूजनाला उत्‍सवाचे स्‍वरुप प्राप्‍त झाले. उत्‍सवाचे स्‍वरुपही बदलले. लोकमान्‍य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्‍सवाची परंपरा सुरु केली. ब्रिटीश राजवटीच्‍या काळात त्‍यांनी लोकांना एकत्र आणून स्‍वातंत्र्य लढ्यात जनजागृतीचे कार्य केले. यासाठी सार्वजनिक गणेशोत्‍सवाची परंपरा त्‍यांनी पुण्‍यातून सुरु केली.

आताचे गणेशोत्‍सवाचे स्‍वरुप फार वेगळे आहे. स्‍वातंत्र्यापूर्वी अतिशय वेगळ्या पद्धतीने गणेशोत्‍सव साजरा व्‍हायचा. आम्‍ही तुमच्‍यासाठी स्‍वातंत्र्यापूर्वीच्‍या गणेशोत्‍सवाचे काही खास फोटो... ते पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाईड्सवर क्लिक करा....